सत्यवानाच्या सावित्री आणि फुलेंची सावित्री

सत्यवानाच्या सावित्री आणि फुलेंची सावित्री
आज माझ्या धर्मपत्नीने एक मेसेंज पाठविला होता. ‘ एका सावित्रीने वडाला फेऱ्या मारायला शिकवलं तर एका सावित्रीने अज्ञानाच्या फेऱ्यातून बाहेर पडायला शिकवलं … सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा फुलेंची सावित्री समाजाला कळली असती तर देशाचा इतिहास काही वेगळाच असता…’
प्रिय पत्नीस,
वरील संदेश हा काही प्रमाणात सत्य आणि असत्य आहे असे मला वैयक्तिक वाटते ते कसे याचे मी स्पष्टीकरण देतो.
सत्यवानाची सावित्री ही एक पतिवृत्ता होती जिने आपल्या पतीच्या आयुष्यासाठी यमाशीही युद्ध पुकारले होते व शेवटी NEVER EVER GIVE UP प्रमाणे आपल्या पतीचा जीव परत मिळेपर्यंत लढत राहिली व शेवटी ते साध्य  केले. आजच्या कलयुगात अश्या पत्नींची गरज सर्वच पतींना आहे जी त्याच्या आयुष्याच्या सर्व सुख- दुःखात साथ देऊ शकेन , आज समाजात काही विडंब अश्या परिस्थती उद्भवत आहेत. पत्नी आपल्या पतीच्या वाईट काळात साथ देणे पसंद न करता ‘तू आणि मी तेही फक्त चांगली परिस्थिती असल्यास’ या भावनेकडे मोठ्या प्रमाणात आगेकूच करत आहेत. सत्यवानाच्या सावित्रीप्रमाणे जर ती त्याच्या आयुष्यात खंबीरपणे पाठीमागे नाहीतर सोबत खांद्याला-खांदा लावून उभी राहिली तर ती आपला परिवार व संसार अबाधित व सुख-समृद्धीपूर्ण ठेवू शकेन.
फुलेंची सावित्री ह्या सत्यवानाची सावित्री ह्यांच्याकडून बहुतेक प्रेरणा घेतल्या असाव्यात अन्यथा त्या घरी अठरा विश्व् दारिद्र्य असताना त्यांच्या पतीच्या सत्कार्यात सहभागी झाल्या नसत्या , त्या फक्त आपल्या पुरता विचार करून वेगळा मार्ग शोधू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या पतीच्या कार्यात स्वतःला वाहून टाकले. अंगात भणभनलेला ताप असतानाही त्या आपल्या पतीने चालू केलेल्या चळवळीतून माघार न घेता त्या करत राहिल्या. त्या फक्त एका साडीवर देखील आपले ध्येय साध्य करू शकल्या.
कलयुगातील स्पर्धेचे जीवन जगणाऱ्या (राहणीमान, पोशाख,मिरवणेपणा) पत्नी ज्या सत्यवानाची सावित्री आणि फुलेंची सावित्री यांच्यातील श्रेष्ठेबद्दल वक्त्यव करणाऱ्यांनी आपण ह्या दोन्ही सावित्रीपैकी एकीकडून प्रेरणा घेतली आहे का हा प्रश्न स्वतःला विचारून पाहावा मगच मत प्रकट करावे.
आजच्या युगात प्रत्येक पत्नीने जर सत्यवानाची सावित्री आणि फुलेंची सावित्री यांच्याकडून प्रेरणा घेतल्यास फक्त वैयक्तिकच नव्हे समाजामध्ये देखील त्या आजही नवीन इतिहास घडवण्याची क्षमता राखतात. आपल्या पतीसोबत जर त्या खांद्याला-खांदा लावून उभी राहिल्या तर त्या पुरुषांस कोणीही ह्या पृथ्वीतलावर हरवू तर शकणारच नाही तर तो स्वतःच्या कुटुंबाचेच तसेच देशाच्या नावाचे अटकेपार झेंडे लावू शकेन. तसेच आपली पत्नी सावित्रीसारखी असावी अशी अशा बाळगणाऱ्या प्रत्येक पतीने देखील काय आपण सत्यवान किंवा महात्मा फुलेंसारखं त्यांना आपलेसे मानले आहे का , मान-सन्मान दिला आहे का, वागवणूक दिली आहे का हे प्रश्न नक्की विचारून पुढे पावले टाकावीत.
– महादेव बिरादार
About Varsha 12 Articles
A post graduate from IIT (ISM), Dhanbad, I am currently working as a teaching consultant. I am the person who believes in philosophy that the more you share the knowledge, the more you will learn and only quality education and knowledge can make someone a Complete Person -A good balanced human being.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*